मराठी

डॉ. भारती चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मानिनी फाऊंडेशन एक लाख मास्क वाटणार

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,९-७-२०२१.
पिंपरी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, महाराष्ट्र व गोवा ॲन्टीकोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मानिनी फाऊंडेशन व गुणवंत कामगार कल्याण परिषदेच्या वतीने महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये एक लाख मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती मानिनी फाऊंडेशनच्या कार्याध्यक्षा कल्याणी कोटूरकर, सचिव सुनिता शिंदे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

मागील दिड वर्षापासून कोरोनाचा सामना करीत असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, वैद्यकीय, आरोग्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोलिस, प्रशासन, वीज पाणी पुरवठा विभागातील कर्मचा-यांनी धोका पत्करुन सेवा केली आहे. वेळ प्रसंगी या कर्मचा-यांना सुरक्षा साधनेही उपलब्ध झाली नाहीत. यामध्ये अनेक कर्मचा-यांचा, त्यांना कुटूंबातील सदस्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू देखिल झाला आहे.

या कर्मचा-यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा त्यांना भेटून त्यांचा उचित गौरव करणे आणि त्यांना योग्य व्यासपिठ उपलब्ध करुन देऊन कोरोना महामारीच्या काळातील त्यांचे अनुभव सर्वांपुढे आणून जनजागृती करण्यात येणार आहे. डॉ. भारती चव्हाण यांनी मानिनी फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी आरोग्य, शिक्षण, उद्योग, रोजगार, कौटूंबिक अत्याचार या क्षेत्रात अल्पावधीतच उल्लेखनिय काम केले आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील त्यांचे हे कार्य आता देशभर विस्तारीत आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button