मराठी

डॉ. डी वाय पाटील रुग्णालयात …कोरोनाबाधित रुग्णांवर “अँटीबॉडी कॉकटेल” उपचार पद्धती ठरत आहे प्रभावी

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१०-७-२०२१.
कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असतानाच, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांवर “अँटीबॉडी कॉकटेल” उपचार पद्धती प्रभावी ठरत आहे. नुकत्याच पिंपरी येथील डॉ. डी वाय पाटील रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये दोन कोरोना बाधित रुग्णांना “अँटीबॉडी कॉकटेल” उपचार देऊन पूर्णपणे बरे केले आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीजच्या वापरामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

या औषधामध्ये दोन कृत्रिम रेणूंचे मिश्रण आहे जे कोरोना विषाणूंविरूद्ध नैसर्गिक मानवी प्रतिपिंडांची नक्कल करतात. हे औषध मोनोक्लोनल अँटीबॉडीज नावाच्या अत्यंत अत्याधुनिक औषधांच्या समूहांपैकी एक आहे. हे विविध प्रकारच्या आजारांविरूद्ध अत्यंत प्रभावी आहेत. या उपचार पद्धतीसाठी दोन रुग्ण निवडण्यात आले होते. यातील एक रुग्ण हा अतिजोखीम गटातील होता तर दुसऱ्या रुग्णामध्ये ताप, थकवा आणि इतर सौम्य लक्षणे दिसून आली होती. त्यांची काळजीपूर्वक क्लिनिकल ट्रायल्ससाठी निवड करण्यात आली, या दोन्ही रुग्णांच्या रक्त वाहिनीमध्ये कासिरिव्हीमॅब आणि इंडेव्हिमॅब ही दोन इंजेक्शन्स सोडण्यात आली, आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button