मराठी
Trending

डॉ. शरद गडाख यांची अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड*

*अहमदनगर प्रतिनिधी( महा ) (विलास गिर्‍हे ), :—दि. 19 सप्टेंबर, *
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जाहिरात मे-2022 ला प्रसिध्द झाली होती. राज्यपाल नियुक्त कुलगुरु शोध समितीने कुलगुरुपदासाठी मुलाखती घेवून पाच नावांची शिफारस महामहिम राज्यपाल यांच्याकडे केली. महामहिम राज्यपाल यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांची डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोल्याच्या कुलगुरुपदी निवड केली आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले.
डॉ. शरद गडाख सध्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या संशोधन व विस्तार शिक्षण संचालकपदी कार्य करत आहे. त्यांची कृषि विद्यापीठात 38 वर्ष सेवा झाली आहे. या सेवेकाळात त्यांनी विविध पदावंर काम केलेले आहे. त्याच्या कार्यकाळात विद्यापीठाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु झाली. त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम महात्मा फुले कृषि विद्यापीठात राबविले. यामध्ये विद्यापीठाची पडीक जमीन लागवडीखाली आणने, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठाचे विक्री केंद्र सुरु करणे, फळबागेखाली लागवड क्षेत्र वाढविणे, विविध फळांचे प्रात्यक्षिक प्रकल्प, सेंद्रिय शेती प्रकल्प,देशी गाय संशोधन अंड प्रशिक्षण केंद्र, शेती मध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, जास्तीत जास्त क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणणे, बिजोत्पादन वाढविणे, एकात्मिक शेती पध्दत मॉडेल, मॉडेल व्हिलेज इ. नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले. यामुळे विद्यापीठाच्या महसुली उत्पादनात वाढ होवून शेतकर्यांना त्यांच्या जिल्ह्यातच विद्यापीठाचे उत्पादने उपलब्ध झाली. तसेच शेतकरी प्रथम आणि मॉडेल व्हिलेज संकल्पनेमुळे कृषि विस्तारामध्ये नविन मापदंडे स्थापीत झाली.
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात दैदिप्यमान कार्य केलेले आहे. त्यांनी विविध पिकांचे 19 वाण विकसित केलेले आहेत. यामध्ये वांग्याचा एक, कारल्याचे पाच, काकडीचे दोन, वालचे एक, ज्वारीचे नऊ आणि नागलीचा एक वाण विकसित केलेले आहे. त्यांचे आत्तापर्यंत 80 संशोधन लेख, 43 तांत्रिक लेख, 144 विस्तार लेख आणि विविध प्रकाशने प्रसिध्द झालेली आहेत. ते दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कृषि कार्यक्रमातून शेतकर्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांनी विकसीत केलेल्या ज्वारीच्या पंचसुत्री व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे शेतकर्यांना कोरडवाहू ज्वारीचे शाश्वत उत्पन्न मिळू लागले आहे. त्यांच्या शिक्षण, संशोधन आणि कृषि विस्तारातील अभुतपूर्व योगदानामुळे त्यांना जागतिक स्थरावरील एक पुरस्कार, राष्ट्रीय पातळीवरील तीन पुरस्कार आणि राज्य पातळीवरील सहा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या निवडीमुळे राज्याच्या सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button