मराठी

राज्यातील कोरोना आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी

*राज्यातील कोरोना आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी*
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, १५-५-२०२१. महापालिका अधिकारी आणि कर्मचारी करणार आर्थिक मदत

(दि. १४ मे २०२१) : राज्यातील कोरोना आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून महापालिका अधिकारी आणि कर्मचारी आर्थिक मदत करणार आहेत. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व विभागांना परिपत्रकाद्वारे सूचित केले आहे.
कोरोना आपत्तीच्या दुस-या टप्प्यात महाराष्ट्र राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे गंभीर परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्य शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महसूल विभाग, गृह विभाग तसेच अन्य संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी कोरोना आपत्तीच्या निवारण्यासाठी प्रभावी उपाययोजना करित आहेत. यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे.
या आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य व मदत व पुनर्वसनाच्या कामास आपलाही हातभार लागावा म्हणून मानवतावादी दृष्टीकोनातून राज्याला देणगी म्हणून आर्थिक मदत करणे आवश्यक असल्याने सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, मंडळे तसेच सर्व स्वायत्त संस्थेच्या सेवेत कार्यरत असलेल्या गट-अ तर गट-ब मधील राजपत्रित अधिकारी त्यांच्या पगारातून देण्यात येणार आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button