संजय (नाना) काटे, युवा मंच दापोडी,व कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान यांच्या वतीने घरगुती गणपती स्पर्धा २०२१.विजेत्यांचा गौरव

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,२२.९.२०२१.
संजय नाना काटे, युवा मंच दापोडी व कै. शांताराम बाईत, प्रतिष्ठान यांच्या वतीने घरगुती गणपती स्पर्धा २०२१. घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये १२०.स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यावेळी दापोडी, फुगेवाडी, कासरवाडी, विभागातील महिलांनी बहुसंख्य सहभाग घेतला होता यावेळी स्पर्धेमध्ये मधील विजेत्यांना माननीय संजय नाना काटे, (मा.नगरसेवक पि.चि.मनपा)अमित काटे, व माधवी बाईत, यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.प्रथम क्रमांक अश्विनी मते, द्वितीय क्रमांक सारिका जाधव, तृतीय क्रमांक सीमा मिर्झापुरे, चतुर्थ क्रमांक अलका दाभोळकर, पाचवा क्रमांक सुनिता बोत्रे, उत्तेजनार्थ सविता काळभोर, राणी कांबळे ,सुवर्णा काळभोर,नंदा पाटील ,शारदा पवार यांना देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी संजय नाना काटे यांनी बोलताना आज प्रत्येक महिलाही स्वतः घरामध्ये सजावट करून स्पर्धेमध्ये भाग घेतात आज कोरोना सावट कमी झालेला नसताना खरोखरच महिलांचा सहभाग हा उल्लेखनीय आहे.यावेळी जयसिंग काटे,निखिल मते,विलासआण्णा काटे,दाविद बळीद,हंसराज काटे, कालिचरण पाटोळे,सदगुरु काटे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र बाईत, यांनी केले व आभार प्रर्दशन अनिल मोरे, यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed