गरज सरो वैद्य मरो” म्हणत खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी केला पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचा निषेध

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,११-६-२०२१.
कोरोना संकट काळात रुग्णांकडून शासकीय दरापेक्षा वाढीव दराने बिले आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा इशारा महापालिकेने दिला . आता शासन निर्णयानुसार महापालिका या रुग्णालयांचे ऑडिट करणार आहे, परंतु यात महापालिकेच्या चुकीच्या कार्यपध्दतीमुळे शहरातील लहान रुग्णालये नाहक भरडली जात असल्याचा आरोप करत या खाजगी रुग्णालयांच्या पिंपरी – चिंचवड हॉस्पिटल असोसिएशनकडून प्रशासनाचा निषेध केला आहे . पिंपरी – चिंचवड हॉस्पिटल असोसिएशनच्या वतीने मंगळवारी ( दि .०८) पत्रकार परिषद घेत यात वास्तव काय आणि सत्य परिस्थिती काय याची वास्तववादी भूमिका मांडण्यात आली.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ . गणेश भोईर , खजिनदार डॉ. माधव चव्हाण, सेक्रेटरी डॉ. प्रमोद कुबडे, उपाध्यक्ष संदीप सांडभोर , सहसचिव दीपक शिंदे , डॉ. अंजली दुधगावकर, डॉ.प्रशांत माने, डॉ.हितेंद्र अहिरराव, डॉ महेश कुदळे उपस्थित होते . यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी म्हणाले की, रुग्णांना आम्ही देव, योद्धे होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *