पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी वर्गासाठी विमा पॉलिसी न राबविता, धन्वंतरी स्वास्थ योजना चालू ठेवावी – संजोग वाघेरे पाटील

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२२-१-२०२१.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी वर्गासाठी विमा पॉलिसी न राबविता, धन्वंतरी स्वास्थ योजना चालू ठेवण्यात यावी. तातडीने विमा पॉलिसी लागू करण्याची कार्यवाही थांबवावी आणि धन्वंतरी स्वास्थ योजना तातडीने लागू करावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पाटील. यांनी आयुक्तांकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचा-यांवर वैद्यकीय उपचारासाठी धन्वंतरी स्वास्थ योजना १.सप्टेंबर २०१५. पासून लागू करण्यात आली होती. ही योजना महानगरपालिकेतीली कर्मचारी, अधिकारी वर्गाच्या हित डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात राबविण्यात आली होती. परंतु, महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकारी व नेत्यांनी कर्मचा-यांसाठी विमा योजना राबविण्याचा घाट घातला.
या योजनेला सुरुवातीपासून विरोध होत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाने या योजनेतील त्रृटी दाखवून देत विमा पॉलिसी न राबविण्याची आग्रही मागणी केली आहे. विमा पॉलिसी राबवू नये, तसेच धन्वंतरी स्वास्थ योजना चालू ठेवण्यासाठी त्यांनी बुधवारी, दिनांक २०. जानेवारी २०२१. रोजी लाक्षणिक उपोषण कर्मचारी वर्गाने केले. धन्वंतरी स्वास्थ योजना तुर्तास बंद करण्यास मा. औद्योगिक न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेले आहेत. तसे असताना सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे प्रशासनामार्फत विमा पॉलिसी अंमलात आणण्यासाठी सर्व खटाटोप सुरू आहे.