सरकारी कामात अडथळा आणला तरी हि प्रशासन झोपेत

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
(पुणे देहूरोड) दिनांक 30 एप्रिल रोजी सरकारी कामात अडथळा आणला म्हणुन देहूरोड पोलिस स्टेशनला कन्टोमेन्ट बोर्ड च्या वतीने तक्रार करण्यात आली,पण आज एक महीना होऊन देखील कोणतीच कार्यवाही केलेली दिसत नाही, कन्टोमेन्ट प्रशासन राजकीय दबावात काम करण्याची चर्चा आता रंगू लागली आहे ..
कन्टोमेन्ट बोर्ड.(देहूरोड) हद्दीत सरकारी जागेवर बांधकाम सुरू असताना कन्टोमेन्ट चे इंजिनिअर व सोबत काही आधिकारी बांधकाम करू नका असे सांगायला गेले असता त्याना शिवीगाळ करून कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अर्ज करून सुधा कार्यवाही होत नाही.
गेल्या महिन्या 19 एप्रिल रोजी कन्टोमेन्ट च्या हॉस्पिटल मधे एक तरुण सागर राजू कटारे (वय 22) मरण पावला होता, प्रशासनाच्या हलगर्जीपणा मूळ तरुण मयत झाला हा राग मनात धरून त्याच्या नातेवाईकांनीं हॉस्पिटल मधे जोरदार भांडण केले तर त्या नातेवाईकांच्या 25/26 लोकांवर IPC 353 कायदा अंतर्गत कार्यवाही करून त्यात 5 तरुण मुलांना येरवडा जेल ला पाठवण्यात आले.
गरीब जनते वर कोणताही वेळ न लावता कार्यवाही करणाऱ्या देहूरोड कन्टोमेन्ट ला राजकीय दबाव आला म्हणुन ह्या लोकांवर कार्यवाही करू वाटत नाही.