मराठी

महात्मा फुले कृषी विद्यापीठात डिजिटल शेतीद्वारे काटेकोर पाणी व्यवस्थापनावरील ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न डिजिटल तंत्रज्ञान वापरून शेती करणे गरजेचे

अहमदनगर प्रतिनिधी/ विलास गिर्‍हे
डिजिटल शेती द्वारे काटेकोर पाणी व्यवस्थापनामुळे पाण्याची, खतांची बचत होऊन शेतकऱ्याच्या वेळेचीही बचत होते व दर्जेदार उत्पादन मिळते. डिजिटल शेती ही काळाची गरज आहे. ऑनलाइन प्रशिक्षणाचा कार्यक्रम ही एक अभिनव अशी संकल्पना आहे. यामध्ये आपला बहुमूल्य असा वेळ खर्च न करता सध्याच्या लॉक डाऊनच्या काळामध्ये अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करणे म्हणजे गरज ही शोधाची जननी असते, असे म्हटले तर वावगे ठरू नये असे प्रतिपादन राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे राष्ट्रीय संचालक आणि नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. आर.सी. अग्रवाल यांनी केले.
जागतिक बँक अर्थसहाय्यित राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद ;नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डॉ अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पाद्वारे डिजिटल शेती द्वारे काटेकोर पाणी व्यवस्थापन या विषयावर एका आठवड्याचे ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे राष्ट्रीय संचालक आणि नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. आर.सी. अग्रवाल बोलत होते. या ऑनलाइन प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी. विश्वनाथा ऑनलाइन उपस्थित होते.प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रभात कुमार, कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. ए. एल. फरांदे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, नवी दिल्ली येथील सिंचन व निचरा आंतरराष्ट्रीय आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. यल्ला रेड्डी, प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक आणि या प्रशिक्षणाचे निमंत्रक डॉ.सुनील गोरंटीवार, या प्रशिक्षणाचे प्रमुख प्रशिक्षक पुणे येथील डिजिटल फार्मिंग सोल्युशन्स नेतफिम इरिगेशन चे व्यवस्थापक श्री तुषार करांडे, या प्रशिक्षणाचे सहनिमंत्रक डॉ. मुकुंद शिंदे, ऑनलाइन उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले की पाणी हे नैसर्गिक संपत्ती आहे. पाण्याचा फार काटकसरीने वापर होणे गरजेचे आहे. डिजिटल शेतीमुळे पाण्याची बचत होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.या लॉक डाऊन काळामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोगाने ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करून वेळेचा सदुपयोग केला जात आहे. आपण या प्रशिक्षणाच्या निमित्ताने पूर्ण देशातच नव्हे तर जगाशी ही जोडले गेलेलो आहोत. येणाऱ्या काळात सर्व विद्यापीठांनी ऑनलाइन पद्धतीचे प्रशिक्षणे आयोजित करायला हवीत जेणेकरून प्रशिक्षणासाठी हजर राहण्याकरिता प्रवासाचा वेळ वाचेल.
याप्रसंगी डॉ प्रभात कुमार म्हणाले, तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्या संदर्भातच होईल. यासाठी पाण्याचे महत्त्व जाणून आपण शेती क्षेत्रातील पाणी बचतीचे तंत्रज्ञान अवलंब करणे गरजेचे आहे. यादृष्टीने हे ऑनलाईन प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. यावेळी अधिष्ठाता डॉ. ए.एल. फरांदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले, डॉ शरद गडाख,सिंचन व निचरा आंतरराष्ट्रीय आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. यल्ला रेड्डी, प्रमुख प्रशिक्षक श्री तुषार करांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. सुनील गोरंटीवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या मिस स्नेहल दुबे ,के. एन.हर्ष , मयुरी खंडागळे, डॉ. राकेश शारदा, इंजि. सिद्धेश माने, डॉ.प्रमोद चौधरी ,डॉ. पूर्णचंद्र गवडा, सुयोग होसे व प्रियंका शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. मुकुंद शिंदे यांनी या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
या प्रशिक्षणासाठी जग भरातून १०० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या मध्ये अमेरिका, देशातून नवी दिल्ली, हरियाणा, पंजाब, केरळा, ग्वालियर आणि महाराष्ट्र राज्यातून शास्त्रज्ञ अधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी ऑनलाइन प्रशिक्षणासाठी सहभागी झाले होते.या ऑनलाईन ्प्रशिक्षणाच्या नियोजनासाठी सह-संशोधक डॉ मंगला पाटील, मंगेश बाविस्कर, डॉ. वैभव मालुंजकर आणि इ. मोसीन तांबोळी यांनी योगदान दिले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button