देहू, कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या ( केल्याची घटना देहू येथे घडली आहे

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक-३१-५-२०२१.
श्री क्षेत्र देहू येथील वडाचा मळा येथे राहणाऱ्या वैभव लांबकाणे या तरुणाने घरा जवळच राहणाऱ्या पूजा पाटील हिच्यासोबत मागील तीन महिन्यापूर्वी प्रेम विवाह केला होता. वैभवच्या घरच्यांचा या प्रेम विवाहाला विरोध होता. विवाहानंतर अनेक शुल्लक कारणावरून पती वैभव हा पत्नी पूजाला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ लागला होता. किरकोळ कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडणे ही होऊ लागली.
गुरूवारी सायंकाळच्या सुमारास पती वैभव तसेच पत्नी पूजा यांच्यात जोरदार भांडण झालं. मध्यरात्री पूजा झोपेत असताना भांडणाचा बदला घेण्यासाठी वैभवने झोपेत असतानाच पूजाचा गळा आवळला. आपला जीव वाचवण्यासाठी तसेच वैभवच्या हातातील गळा सुटावा यासाठी पूजाने अनेक वेळा प्रयत्न केले पंरतू तिचा मृत्यू होईपर्यंत वैभवने तिचा गळा सोडला नाही आणि अखेर पूजाचा मृत्यू झाला.
रात्रभर पूजाच्या मृतदेहा शोजारीच वैभव बसून राहीला. त्यानंतर सकाळ होताच मयत पूजाच्या नातेवाईकांना त्याने सांगितले की, पूजाच्या छातीत दुखत होतं त्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांन तात्काळ पूजाच्या घरी दाखल झाले असता बिछाण्यातच तिचा मृतदेह त्यांना आढळून आला.
संबधीत घटनेबाबत पूजाच्या नातेवाईकांनी देहूरोड पोलिसांना खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत शहानिशा केली असता त्यांना संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटला. मग पोलिसांनी वैभवला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच कौटुंबिक कलहातून वाद झाल्याने पूजाचा गळा आवळून मारल्याची कबुली त्याने दिली.