मराठी

ग्राहक जागृत झाल्यास ग्राहकाची फसवणूक टळेल – व्‍ही सी प्रेमचंदानी

अहमदनगर प्रतिनिधी :— विलास गिर्‍हे दि. 20: ग्राहक जागृत झाल्यास ग्राहक संरक्षणाचे अनेक प्रश्न आपोआप सुटतात. ग्राहकाच्या सजगतेमुळे वस्तू किंवा सेवा खरेदीप्रसंगी फसवणूक होण्याची शक्यता कमी होण्यासह मदत होईल असे मत जिल्‍हा तक्रार निवारण मंचाचे अध्‍यक्ष तथा न्‍यायाधिश व्‍ही सी प्रेमचंदानी यांनी आज व्यक्त केले.

‘जागो ग्राहक जागो’ मोहिमे अंतर्गत जिल्‍हा पुरवठा कार्यालयामार्फत जिल्‍हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे अशासकीय सदस्य आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी एकदिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, जिल्‍हा पुरवठा अधिकारी श्रीमती जयश्री माळी, अन्‍न व औषध प्रशासन सहायक आयुक्‍त संजय शिंदे, वैधमापन शास्‍त्र सहायक आयुक्‍त श्री गेटमे, अॅड. प्रज्ञा हेद्रे-जोशी, श्रीमती व्‍ही सी डोंगरे, सहा. जिल्‍हा पुरवठा अधिकारी सुनिल सौदाणे आदि यावेळी उपस्थित होते..

ग्राहक आपल्या हक्कासाठी जागृत झाल्यास ग्राहक संरक्षणाशी निगडित अनेक प्रश्न आपोआप सुटतात,असे सांगून श्री. प्रेमचंदानी म्हणाले, शासनाने ग्राहकहिताचे अनेक कायदे केले आहेत. या कायद्यांविषयक तसेच वस्तू किंवा सेवेची खरेदी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे फसवणूक टाळता येणे शक्य आहे. यातूनही फसवणूक झाल्यास न्यायालयातून न्याय निश्चितच मिळू शकतो असे त्‍यांनी यावेळी सांगितले..

अॅड.श्रीमती प्रज्ञा हेंद्रे-जोशी म्‍हणाल्‍या, ग्राहक संरक्षण कायदा,2019 मधील विविध तरतुदींची माहिती दिली. ग्राहकाची व्याख्या, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या वस्तू व सेवा, ग्राहकांचे सहा अधिकार, वस्तू व सेवांविषयी फसव्या जाहिराती, ग्राहकाच्या फसवणुकीचे प्रकार, भेसळ आदींविषयी माहिती देऊन फसवणूक झाल्यास कुठे तक्रार करायची याबाबत माहिती यावेळी दिली.

श्री जगताप म्‍हणाले, यांनी कृषी क्षेत्रातील शासनाच्‍या विविध योजनांची माहिती दिली. शेतकरी जेव्‍हा बियाणे खरेदी करतो त्‍यावेळी त्‍यांनी बियाची पिशवी खालच्‍या बाजूने फोडून जतन करावी. तक्रार करताना या पिशवीवर असलेला लॉट नंबरमुळे उत्‍पादक ते ग्राहकापर्यतची माहिती मिळू शकते व रासायनिक खताचा वापर करतांना पावती व बॅच नंबर जतन करुन ठेवावी असे सांगितले.

श्री गेटमे म्‍हणाले, थेट विक्री करणा-या कंपन्‍यामध्‍ये कामकाज व त्‍यांच्‍या विरुध्‍द येणा-या तकारीचे निराकरण याबाबतची माहिती तसेच वैधमापन शास्‍त्र यंत्रणेचे कार्य व यंत्रणेचे संगणकीकरण इत्‍यादी बाबतची माहिती दिली.

श्री शिंदे म्‍हणाले, अन्‍न सुरक्षा, भेसळ व वस्‍तूचा दर्जा ठरविण्‍यासाठी उपलब्‍ध असलेल्‍या प्रयोग शाळांची माहिती व कार्याची माहिती दिली. तसेच सहा. जिल्‍हा पुरवठा अधिकारी श्री सौदाणे यांनी अन्‍न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत पुरवठा विभागाचे कामकाज तसेच ई-पॉस मशिन याबाबतची माहिती दिली. या कार्यशाळेस जिल्‍हयातील ग्राहक सदस्‍य उपस्थित होते. या कार्यशाळेस अशासकीय सदस्‍य व कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button