पुण्यात जबरी चोरी करणाऱ्य़ा टोळीला अटक गुन्हे शाखेची कारवाई

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,३-६-२०२१.
पुणे… लोणीकंद परिसरात जबरी चोरीचा तपास गुन्हे शाखेचे पथक करीत होते. त्यावेळी संबंधित चोरी सराईत गुन्हेगार इशाप्पा पंदी याने साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती पोलिस शिपाई ऋषिकेश ताकवणे आणि ऋषिकेश व्यवहारे यांना मिळाली.आरोपी इशाप्पा केसनंद फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा दुसरा साथीदार प्रदीप उर्फ बाबू यालाही पोलिसांनी केसनंदमधून अटक केलीशहरातील लोणीकंद परिसरात जबरी चोरी करणाऱ्य़ा टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट सहाने अटक केले. .
आरोपींकडून मोटार, दुचाकी, चार मोबाईल, फ्रीज, शेगडी, ब्रॅण्डेड कपडे, असा मिळून ७.लाख १५.हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. इशाप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पंदी, प्रदीप उर्फ बाबू यशवंत कोंढाळकर, ओंकार गुंजाळ, विजय राठोड, गणेश काळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.