लाचखोर डीवायएसपी आणि पोलीस निरीक्षकाची भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण … प्रकणाची चौकशी होणार

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक. २९-५-२०२१.
जालना जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात जाऊन रुग्णालयाची तोडफोड केल्यामुळे भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. भाजप युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले असा पोलिसांनी मारहाण केलेल्या युवकाचे नाव आहे. कोविड रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. यामुळे संतप्त जमावाने रुग्णालयावर धावा बोलून रुग्णालयाची तोडफोड केली.
रुग्णालयात पोलीस दाखल झाल्यानंतर पोलिसांसोबत हुज्जतही या कार्यकर्त्याने घातली. त्यामुळे पोलिसांनी काठीचा वापर करुन कार्यकर्त्याला बेदम मारले होते या मारहाणीचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यामुळे ही घटना अधिकच चर्चिली गेली आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
भाजप युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले आणि इतर कार्यकर्त्यांना जालन्यातील रुग्णालयात जाऊन तोडफोड केली होती. ९ एप्रिलला एका युवकाचा अपघात झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यामुळे डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरुन रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. हे रुग्णालय कोविड सेंटर होते. यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करत तोडफोड करणाऱ्या जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.