मराठी
महानगरपालिकेच्या ३५०० कोटींपेक्षा जास्त कोटी रुपयांच्या ठेवी काय फक्त व्याज खायला ठेवल्यात का ??? … राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष ‘प्रशांत शितोळे’ यांचा सवाल!

संवाददाता, पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, २८-५-२०२१.
(दि.२७मे) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील नागरिकांना लसीकरण करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष ‘प्रशांत शितोळे’ यांनी यापूर्वीच केली होती त्यानंतर महानगरपालिकेने ग्लोबल टेंडर काढण्याची परवानगी राज्य शासनाने द्यावी असा मुद्दा उपस्थित होता. परंतु महाराष्ट्र शासनाने शासनाची परवानगी ची आवश्यकता नाही असे जाहीर केले. महानगरपालिकेच्या ३५००/- कोटींपेक्षा जास्त कोटी रुपयांच्या ठेवी काय फक्त व्याज खायला ठेवल्यात का ??? … त्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी वापरा असा सवालही प्रशांत शितोळे यांनी उपस्थित केला आहे.