औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय) येथे कोरोना विलगिकरण केंद्र आजपासुन सुरु.

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, २४-४-२०२१.
सध्याच्या कोरोनाच्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे,त्यातच विलगिकरण केंद्रे लांब ठेवल्याने नागरीक घरातच राहत आहेत आणी यातून हा उद्रेक वाढतच चालला आहे. या सर्व बाबी लक्षात घेवून पुण्याच्या
उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर, यांनी आरोग्य अधिकारी व प्रशासनिक अधिकारी यांना बोलावून घेत औंध येथील औद्यगिक प्रशिक्षण संस्थेत गेल्या वेळी बनविलेले विलगिकरण केंद्र पुन्हा नव्याने सुरु करण्याच्या सूचना केल्या.त्यामुळे आजपासून हे विलगिकरण केंद्र कार्यान्वीत होत आहे.यावेळी
उपमहापौर सौ.सुनिता वाडेकर म्हणाल्या की प्रभागात झोपडपट्टी भागात नागरिकांची घरे लहान लहान असून त्यांना लागण झाल्यास घरातच विलगिकरनामुळे उद्रेक वाढत चाललाय आणी यातच विलगिकरण केंद्रे बालेवाडी,येरवडा,खराडी अशा लांबच्या भागात केल्याने नागरिकांची गैरसोय होतेय म्हणून घरापासून जवळच प्रभागात हे केंद्र सुरु करण्यात येत आहे याचा लाभ नागरिकांना होणार आहे आणी झोपडपट्टयांमधील कोरोनाची साखळी तूटन्यास मदत होईल.म्हणून हे १५० खाटांचे विलगिकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.
या वेळी रिपाई नेते परशुराम वाडेकर,औंध बाणेर चे सहाय्यक आयुक्त जयदीप पवार,कनिष्ठ अभियंता अश्विनी लांघी,डॉ.गणेश ढमाले,डॉ.वावरे,आरोग्य निरिक्षक गोपाळ भोईर उपस्थित होते.