मराठी

अखंड हरिनाम किर्तन.मोहोत्सव.कामशेत.मावळ

संवाददाता.तानाजी केदारी.
महाराष्ट्र राज्य प्रमुख.

अखंड हरिनाम कीर्तन महोत्सवामध्ये आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तने सेवा एकनाथ महाराजांचे वंशज ह. भ. प. योगिराज महाराज गोसावी यांची संपन्न झाली. कीर्तन सेवेमध्ये महाराजांनी अधोगतीला जाणाऱ्या समाजाला योग्य दिशा देण्याचे हिताचे काम संत करतात, भगवंताची भेट करून देतात. म्हणून संत सहवास हा खुप महत्वाचा आहे, संत सहवासानेच ईश्वरप्राप्ती होते, आणि त्यासाठी साधनाची आवश्यकता असते, भगवंताचे नाम हेच सर्व साधनांचे सार असून संत त्याचा नेहमी आग्रह धरतात. पापी लोक जेवढे पाप करू करतात तेवढे पाप एका भगवंताच्या नामाने नष्ट होते, कोटी कोटी यज्ञ केल्याने जेवढे पुण्यप्राप्ती होते तेवढी एका नामाने होत असते. कीर्तन सोहळ्यास मा. श्री. अरविंद भैया माने (आमदार मोहोळ विधानसभा, जि:- सोलापूर), मा. श्री. निलेशजी लंके (आमदार पारनेर विधानसभा, जि:- अहमदनगर), मा. श्री. राजुभैया नवघरे (आमदार वसमत विधानसभा, जि:- हिंगोली), मा. श्री. चेतनजी तुपे (आमदार हडपसर विधानसभा), मा. श्री. सुनिल आण्णा टिंगरे (आमदार वडगांव शेरी विधानसभा), मा. श्री. अतुल भाऊ बेनके (आमदार जुन्नर विधानसभा), श्रीमती सुलोचनाताई आवारे (जेष्ठ नगरसेविका तळेगांव दाभाडे नगरपरिषद) आणि कीर्तन सेवा ऐकण्यासाठी लोटलेला असंख्य जनसमुदाय उपस्थित होता. सर्व आमदारांनी सुरू असलेल्या अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्याचे तसेच आमदार सुनिल आण्णा शेळके यांचे कौतुक केले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button