आयुक्त साहेब, मागासवर्गीय समाजाचा राग आहे काय?’ – कष्टकऱ्यांना तीन हजार मदत नाकारणाऱ्या आयुक्त राजेश पाटील यांना जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे, यांचा जळजळीत सवाल

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२०-६-२०२१.
कोरोना लॉकडाऊन काळात शहरातील हातगाडी, टपरी, पथारीवाले, भाजी विक्रेते तसेच घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षाचालकांना मोठा आर्थिक फटका बसला. या घटकाला रोख तीन हजार रुपये मदत देण्याचा निर्णय कायद्यावर बोट ठेवून फेटाळण्यात आल्याने जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी आज अक्षरशः दुर्गेचा अवतार घेत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना लक्ष्य केले.
आयुक्त साहेब, मागासवर्गीय समाजाचा तुम्हाला राग आहे का?, असा जळजळीत सवाल उपस्थित करून कायद्यात बसून मदत कशी देता येते याचाही सल्ला सावळे यांनी प्रशासनाला दिला. सत्ताधारी भाजपाच्या वतीने कष्टकऱ्यांची बाजू मांडताना सीमा सावळे म्हणाल्या, स्मार्ट सिटी मध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार सुरु आहे. तिथे नियम अटी, कायदे कानून सगळे दिवसा ढवळ्या पायदळी तुडवले जात आहे. त्या बद्दल मी आपल्याकडे वारंवार दाद मागत आहे. परंतु तिथे आपण कायद्यावर बोट ठेवत नाही. केवळ गोरगरीब मागासवर्गीय समाजाला मदत देताना तुम्हाला कायद्याचा चुकीचा अर्थ काढून खोडा घालता येतो. खरच, आपण जर इतके कायदे प्रिय असाल तर मोठ्या धेंडांवर कायद्याचा बडगा उगारून दाखवा, तिथे मात्र प्रशासन शेपूट घालते. मागसवर्गीय समाजाचा राग आहे कि काय अशी शंका मनात निर्माण होते. कारण तुम्हाला जर मागासवर्गीय समाजाचा कळवळा असताच तर मागासवर्गीय कल्याणकरी निधीतून झोपडपट्टीतील नागरिकांना मदत देता येते.