मराठी

येत्या 14 एप्रिलला समतेचे दिवे लावून भीमजयंती घरीच साजरी करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.11 – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण जीवन समतेसाठी वाहिले.त्यांनी भारताला दिलेल्या संविधानाचे सार समतेच्या तत्वात आहे.त्यामुळे समतेचे प्रज्ञासूर्य ठरलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदाच्या 14 एप्रिल ला आपल्या घरीच राहून साजरी करताना घराघरात समतेचे दिवे लावण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाची भीम जयंती घरीच राहून साजरी करावी ;कोणत्याही स्वरूपात बाहेर मनोरंजनाचे जाहीर कार्यक्रम लावून मिरवणूक काढून गर्दी जमविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. भीम जयंती दरवर्षी आपण एप्रिल ते जून महिन्या पर्यंत साजरी करीत असतो. यावर्षी कोरोनाचे जीवघेणे संकट देशावर घोंघावत असताना लॉकडाऊनचा नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदा 14 एप्रिलला आपण घरीच राहून भीम जयंती साजरी करावी असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.

यंदा 14 एप्रिलला भीमजयंती दिनी सकाळी 11 वाजता सर्वांनी आपल्या घरी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घ्यावी;पुरणपोळी; मिठाई वाटावी त्यांनंतर सायंकाळी आपल्या घराच्या दारात समतेचा दिवा लावून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समतावादी भारत साकारण्याचा निर्धार करावा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.
14 एप्रिल ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त परिसरातील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी प्रशासनाने 3 लोकांना परवानगी द्यावी. अनेक ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालय; रेल्वे स्टेशन; शहरांत मध्यवर्ती चौकांमध्ये अनेक ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत तेथे 14 एप्रिल ला पुष्पहार अर्पण करण्यासाठी 3 व्यक्तींना परवानगी प्रशासनाने द्यावी असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button