पुण्यातील बिबवेवाडीत एका अल्पवयीन मुलींची नात्यातील व्यक्तींकडून क्रुर हत्या

संवाददाता, पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१४.१०.२०२१.
१२. ऑक्टोबर पुण्यातील बिबवेवाडी येथे एका अल्पवयीन मुलींची क्रुरपणे हत्या केल्याची घटना घडली आहे नात्यातील व्यक्तींनेच या मुलींवर कोयत्याने वार करून तिचा खून केलाय विशेष म्हणजे आजुबाजुला छोटी मुलं आणि व्यायाम करणारे नागरिक असतानादेखील आरोपीने हे धाडस केलं आहे, समोर मुलींची हत्या होत असताना छोटी मुलं आजुबाजुला खेळत होती.
झालेली मुलगी इयत्ता आठवी वर्गात शिकत होती. हत्या करणारा
आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईकच आहे. या आोरपीसोबत अन्य दोन व्यक्ती होते. हत्येआधी मुलगी बिबवेवाडी(पुणे) परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी तिचा नातेवाईक तसेच इतर दोघे तिच्याकडे आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली. यातच अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला.