बोपखेल (रामनगर-गणेशनगर) मनपा शाळेतील बाह्य लसीकरण व रोग प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू कराव- श्री भाग्यदेव घुले

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१७-६-२०२१.
बोपखेल रामनगर-गणेशनगर भागात लहान मुले रोग प्रतिबंधक लसीपासून वंचित.. पालिकेचे आरोग्य केंद्रच नसल्याने पालकांची तारांबळ होतं आहे
भाग्यदेव घुले म्हणाले पिंपरी चिंचवड महापालिकेतील समाविष्ट गाव बोपखेल (रामनगर गणेशनगर) भागात आरोग्य सुविधांपासून वंचित आहे. येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. साधे आरोग्य सुविधा केंद्रही परिसरात नाही. तज्ञांनी तिसऱ्या कोरोना लाटेचा अंदाज वर्तविला आहे. यात सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मुलांना साधे रोग प्रतिबंधक लसीकरणही होत नाही. फुकट असणाऱ्या डोससाठी खासगी रुग्णालयात पालकांना मोठी किंमत मोजावी लागते. अशाने गोरगरीब नागरिकांच्या हक्काच्या आरोग्याच्या अधिकाराचे हनन होत आहे. त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे, पालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनातुन विनंती करण्यात आली आहे
परिसरात औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी. पर्यायाने दाट लोकसंख्या व आर्थिक दुर्बल लोक. येथे आरोग्य केंद्र नसल्यामुळे कामगार वस्तीतील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी पालिकेच्या सांगवी भोसरी रुग्णालयात जावे लागते. पालिकेची पर्यायी व्यवस्था नसल्याने अति गंभीर व तातडीच्या वेळी या रुग्णांची मोठी गैरसोय होते. गोरगरीब नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास आरोग्य सुविधांअभावी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य ओळखून बालकांना त्वरित डोस देण्याची व्यवस्था करावी. अशी विनंती आज पालिका आयुक्त श्री राजेश पाटिल, साहेब करण्यात आली.