मराठी

बोगस डॉक्टर, रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला चाप लावा

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२५-८-२०२१.
पिंपरी-चिंचवड मध्ये बोगस डॉक्टर आणि रुग्णांलयांची मनमानी सुरू आहे. रुग्णांना मिळणारे चांगले उपचार आणि आदरपूर्वक वागणुकीचा अभाव, बोगसपणा याबाबत “ऑडिट” होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रतिमहिना अथवा तीन महिन्यांतून एकदा कारवाई व्हावी. तसेच, मोठ्या रुग्णालयांमध्ये तक्रार निवारण कक्ष उभारणे बंधनकरक करावे आणि कक्ष उभारले असतील तर ते सक्षमपणे कार्यान्वयीत करावे, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील, यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील, यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभाग कोविड काळात उत्तमरित्या काम करीत आहे. कोरोना योद्धा किंवा आरोग्य दूत म्हणून बहुतेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी जोखीम पत्करली आहे. मात्र, शहरात बोगस डॉक्टर आणि तोतया आरोग्य कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्याचा परिणाम नागरी आरोग्य व्यवस्थेवर होत आहे. कमी वेळात अधिकाधिक पैसा मिळवण्याच्या हेतूने आरोग्य सेवा देणारी रुग्णालये म्हणजे ‘धंदा’ झाला आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button