स्वस्त धान्य दुकानात काळाबाजार

संवाददाता सौ.पार्वती ढोणे महाराष्ट्र राज्य प्रभारी.
मातोश्री सामाजिक संस्थेचे पिंपरी चिंचवड शहरप्रसिध्दी प्रमूख व शिवसेना शाखाप्रमुख श्री दत्ताभाऊ गिरी यांनी मौजे पिंपळनेर ता. माढा जि. सोलापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार पी.एस.लोकरे यांचे ऑनलाईन दुकान नं. १५२६३४६००१८२ या दुकानाचा परवाना रद्द करण्यास प्रशासनाला भाग पाडले आहे
याच दुकानास जोडलेले दुसरे स्वस्त धान्य दुकान गंगामाई महिला बचत गट, विठ्ठलराव शिंदे सह. साखर कारखाना, गंगामाईनगर पिंपळनेर येथील ऑनलाईन दुकान नं. १५२६३४६००१८४ या दुकानाचाहि परवाना रद्द झालेला आहे.
या दोन्ही दुकानामध्ये विविध जाती धर्माचे लोक एकाच शिधापत्रिकेत एकत्र करून दुकानदार त्यांचे जवळील पाहुणे, मित्र आणि नातलग यापैकी एकाचे आधार कार्ड लिंक करून धान्य उचलत होते. गोरगरीब जनतेला जाणीवपूर्वक वंचित ठेवत होते. या दोन्ही दुकानातून शुभ्र शिधापत्रिका धारक सदस्यांच्या नावेही धान्य वितरण केले जात होते.
एका शिधापत्रिकेतील एकापेक्षा अनेक सदस्यांच्या नावे ३ किंवा त्यापेक्षा अधीक शिधापत्रिका काढून त्याद्वारे पती, पत्नी, आई, मुलगा यांचे नावे धान्य वितरीत केले जात होते. अंतोदय प्रकारची ६ रेशनकार्ड हे दुकानदाराच्या घरातील व नातलगाची असल्याचे आढळून आलेले होते. तसेच सदर स्वस्त धान्य दुकानदार हे ऑनलाईन प्रमाणे धान्य न देता धान्य कमी देणे ,पैसे जास्त घेणे, पावती न देणे इत्यादी कारणामुळे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
यासाठी गावातील व्यक्तींनी प्राणपणाला लाऊन पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, सरपंच ग्रामसेवक पिंपळनेर यांचे कार्यालयाकडे शेकडो ग्रामस्थांनी तक्रार दिलेल्या होत्या.
तसेच या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी गावातील प्रतिष्टीत नागरिक आणि पदाधिकारी पुढीलप्रमाणे श्री. भीमराव रामा बंडगर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र राज्य), श्री. सतीश व्यंकोजीराव पाटील (माजी सरपंच), श्री.हनुमंत ज्ञानोबा जाधव (माजी सरपंच प्रतिनिधी), श्री. गुरुदेव सदाशिव पाटील (माजी उपसरपंच), श्री. विनायक आवारे (ग्रामपंचायत सदस्य), श्री.बाळू जाधव, श्री.सोमनाथ जमदाडे, श्री.बापूराव भोगे, श्री.सुदाम डांगे, श्री.महारुद्र राउत, श्री.दत्तात्रय प्रल्हाद गोडसे, श्री. दत्तात्रयभानुदास डांगे, श्री.दिगंबर पवार, श्री.शिवाजी लोंढे, श्री.सुभाष डांगे, श्री. रामलिंग कांबळे, श्री.किरण पाटील, श्री.नागनाथ जाधव. यांनी या आधी प्रयत्न केले होते.
मातोश्री सामाजिक संस्थेचे कार्य खेडयापाड्यात पोचवल्या बद्दल दत्ता गिरी यांच आभिनंदन संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर. गोरख पाटील. गणेश पाडूळे. रविकिरण घटकार. माऊली जाधव. निलेश भोरे. बाळासाहेब गायकवाड. मारूती म्हस्के. गणेश वाळूंज. यांनी केले.