मराठी
मंदिरे उघडण्यासाठी भाजपाचा* *पिंपरी-चिंचवडमध्ये ‘शंखनाद’; महाविकास* *आघाडी* *सरकारच्या* *निषेधार्थ आंदोलन

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.१-९-२०२१.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या आडमुठेपणामुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे बंद आहेत. ही धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी सोमवारी चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी समाधी मंदिरासमोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शंखनाद व घंटानाद आंदोलन करण्यात आले. चिंचवड,मोरया मंदिर परिसर शंखनाद व घंटा नादाने दुमदुमले.
देशाच्या विविध राज्यात मंदिर, मशिद, चर्च, गुरूद्वारा, बुद्ध विहार अशी विविध धर्मियांची धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. पण महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने एकीकडे माँल, बाजारपेठा, दारूची दुकाने, बार, हाँटेल सुरू करण्यास मोकळीक दिलेली आहे. तर दुसरीकडे धार्मिक स्थळे खुली करण्यास अजूनही मोकळीक न देता निर्बंध कायम ठेवले आहेत.