भाजपाचे स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, ‘यांची स्थायी समितीला हजेरी,,ऑन ॲक्शन

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२-९-२०२१.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, यांना लाच प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर पहिल्याच स्थायी समिती सभेला हजेरी लावली. त्यांनी शहरातील प्रमुख प्रभागतील नगरसेवकांशी सभापती लांडगे, यांनी सांवाद साधला. स्थायी समितीतील भाजपाचे सदस्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर प्रलंबित विकासकामे आणि स्थायी समितीच्या अजेंड्यावर असलेल्या विषयांबाबत संबंधित विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांना सूचना केल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिका सह शहर अभियंता, शहर अभियंता यांच्यासह प्रमुख विभातील अधिकाऱ्यांकडून सभापती लांडगे, यांनी विकासकामांबाबत आढावा घेतला. रस्ते, पाणी, वीज यासह नागरी आरोग्याशी संबंधित विकासकामे मार्गी लावण्याबाबत वस्तुनिष्ठ चर्चा केली.