स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार मुंडे भगिनींवर भाजपकडून अन्याय

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१०-७-२०२१.
औरंगाबादचे: डॉ. भागवत कराड, यांची वर्णी लावण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांत प्रचंड अस्वस्थता आहे. स्व. गोपीनाथ मुंडे, यांच्या पश्चात त्यांच्या वारसदार असलेल्या मुंडे भगिनींवर भाजपकडून अन्याय केला जात असल्याची चर्चा आधीपासूनच होत असताना बुधवारच्या मंत्रिमंडळ विस्ताराने त्यावर जणू शिक्कामोर्तबच करून टाकले आहे
असे राजकीय जाणकारांना वाटते.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बहुजन समाजापर्यंत भाजपची पाळेमुळे पोहोचवणारे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारस खासदार प्रीतम मुंडे यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान जवळपास निश्चित होते, अशी चर्चा असतानाच ऐनवेळी त्यांचा पत्ता कट
औरंगाबादचे महापौरपद भूषवलेल्या डॉ. कराडांची गोपीनाथ मुंडे हीच खरी राजकीय ताकद आणि ओळख होती. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्तार करताना ‘सोशल इंजिनिअरिंग’ साधले असे म्हटले जात असले तरी त्यात राजकीय शह-काटशह देण्याचेच राजकारण झाल्याचे दिसते.