मराठी

भाजप नगरसेविका यांचे पती आणि भावाने त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या एका नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार पुणे शहरातील औंध परिसरात उघडकीस

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,३-७-२०२१.
भाजपा नगरसेविकेच्या पती आणि भावाने त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या रहिवाशाला मारहाण केल्याचा आरोप आहे. पुणे शहरातील औंध परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. औंधच्या भाजप नगरसेविका अर्चना मुसळे यांचे पती मधुकर मुसळे आणि भावावर मारहाणीचा आरोप आहे.

भाजप नगरसेविका अर्चना मुसळे यांचे पती आणि भावाने त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या एका नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुसळे या औंध परिसरातील क्लोरियन पार्क या इमारतीत वास्तव्यास आहेत. मारहाण झालेली व्यक्तीही याच इमारतीत राहत असल्याची माहिती आहे
सोसायटीत आपली बदनामी करणारी पत्र का वाटली? त्यावर तुझीच सही आहे ना?” असा जाब मुसळे विचारत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ मारहाणीसोबतच शिवीगाळ झाल्याचंही ऐकू येत आहे. तर “मला यासंबंधी काहीही बोलायचं नाही. सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये मी सांगेन” असं संबंधित रहिवासी बोलताना ऐकू येतं.

दरम्यान, याबाबत पुण्यातील चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button