विशेष पोस्ट

बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या व्यक्तीला देहुरोड पोलिसांनी ताब्यात घेतले

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२-२२-२०२०.
देहुरोड: मुळशी गावातील एका गटासोबत वाद झाला म्हणून बेकायेदशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या व्यक्तीला देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे फॅक्टरी मेड बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले, आहे. देहुरोड, शहरात नव्याने पदभार स्विकारलेले पोलीस निरीक्षक विलास सोंडे, यांनीही कारवाई केली आहे.

देहुरोड,पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईनगर भागात बेकायदेशीररित्या एक व्यक्ती स्वता: जवळ पिस्तुल बाळगत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास सोंडे, यांना मिळाली होती. त्यानुसार डी बी पथकातील कर्मचारी शाम शिंदे, तसंच दादा जगताप,यांना तत्काळ मार्गदर्शक सुचना देत संबंधीत व्यक्तीबाबत शोध घेण्यास रवाना करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनगर मामुर्डी येथे पोलिसांना एक व्यक्ती संशयितरित्या फिरताना आढळून आला होता. त्याची विचार विचारपूस तसंच अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक फॅक्टरी मेड बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. संबंधित व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव अमोल अशोक कालेकर, असं सांगितले
पोलिसांनी तात्काळ पिस्तुल देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता मावळ येथील पवनानगर येथून अमोल दळवी, या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडूनही एक फॅक्टरी मेड बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूस असा एकूण ८०. हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींवर यापूर्वीही एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button