शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुरुवात …* *एमएचटी-सीईटी २०२१ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची येथे करा नोंदण*

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१०-६-२०२१.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून राज्यात सध्या अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विद्याशाखांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी २०२१.साठी अर्ज नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. अर्जाची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होईल. https://mhtcet2021.mahacet.org या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी आपली नोंदणी करु शकतील.

अर्जनोंदणीला ८.जूनपासून सुरुवात

अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी 8 जूनपासून अर्जाची नोंदणी सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठीचा शेवटाचा दिवस हा ७.जुलै २०२१.असेल. तशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन दिली आहे. अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांना https://mhtcet2021.mahacet.org या लिंकला भेट द्यावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *