मराठी

निर्भय व्हा * * आदरणीय * सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती खेड तालुका बैठक

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१५-१०-२०२१
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन
यांची
राजगुरुनगर येथे कार्यकारिणीची वार्षिक बैठक पार पडली, त्यामध्ये नव्याने मा‌ आनंदराव गावडे, सामाजिक कार्यकर्ते व मा. माणिक राजे निंबाळकर, मा. नायब तहसीलदार, मा. सतीश चांभारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, मा. जोशीसाहेब उपायुक्त पशुसंवर्धन , मा. गुपचूप रावसाहेब बांधकाम विभागाचे, शासकीय नोकरीतून अनेक वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाल्याने त्यांची समितीमध्ये विविध पदावर नियुक्ती करण्यात आली तसेच समितीचे खेड तालुका कायदेशीर सल्लागार म्हणून adv हेमंत बगाटे, adv निलेश आंधळे, adv सुभाष कोहिनकर, यांची नियुक्ती करण्यात आली व तालुका प्रसिद्धीप्रमुख म्हणून अमित टाकळकर,यांची नियुक्ती करण्यात आली तसेच बापू नगरकर, खेड शहर नगरपरिषद कार्यक्षेत्र अध्यक्ष ,पत्रकार अध्यक्ष अर्जुन मेदनकर,आळंदी शहर कार्यक्षेत्र नगरपरिषद अंतर्गत नव्याने समिती गठीत करण्यात आली, त्याच बरोबर तालुका महिला अध्यक्ष व त्यांचे सदस्य संचालक यांची समिती गठीत करण्यात आली, बैठकीमध्ये खेड तहसील कार्यालय येथे १५५. च्या अंतर्गत हजारो केस दाखल आहे परंतु त्याचा निकाल अनेक वर्षांपासून झालेले नाही. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांचे काम करताना भ्रष्टाचार वाढलेला आहे, त्यामुळे लाचलुचपत विभागाकडे संबंधित विभागाचे तक्रारी करण्याचे ठरले. श्री भीमाशंकर देवस्थान येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे होणारा त्रास तीर्थक्षेत्र अंतर्गत भाविक भक्तांसाठी सुरु असणारे निकृष्ट दर्जाचे विविध विकास कामे खेड तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दप्तर दिरंगाई सेवा हमी अंतर्गत काम केले जात नाही वर्षानुवर्षे विलंब लागत आहे तसेच अधिकारी कर्मचारी मुख्यालयात राहत नाही. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेत होत नाही अशा शासकीय विविध कामांवर सर्वानुमते चर्चा करण्यात आली .. अध्यक्ष यांनी व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अनुमोदन देऊन सहमती दर्शवली पै. बाळासाहेब चौधरी, यांनी सर्वांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button