पुण्यात तडीपार गुंडा कडून चक्क API समीर सय्यद ची हत्या,पुणे शहर हादरले

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, ६-५-२०२१.
पुणे : पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कडक लॉकडाऊन सुरू आहे तर दुसरीकडे गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे. फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्री दोन खून झाल्याचे उघडकीस आले आहे. तडीपार असलेल्या गुंड प्रवीण महाजनने फरासखाना……………….पोलीस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक समीर सय्यद यांचा खून केला आहे. पोलिसांनी महाजनला बेड्या ठोकल्या आहे.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ मध्यरात्री १.वाजेच्या सुमारास ही घटना घडली.सहाय्यक उपनिरीक्षक समीर सय्यद (वय ४८.) हे बंदोबस्त आटोपून घरी चालले होते.सय्यद हे खडक पोलीस लाईनमध्ये राहायला होते. सय्यद हे श्रीकृष्ण टॉकीजवळ पोहोचले असता प्रवीण महाजनने त्यांचा खून केला. नेमका हा खून का आणि कशासाठी केला याची माहिती अद्याप मिळू शकली नाहि
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून प्रवीण महाजन याला अटक करण्यात आली आहे.