पुण्यातून आली चिंता वाढवणारी बातमी, कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढळली नवी बुरशी

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक,१५.१०.२०२१.
पुणे, १४. ऑक्टोबर : कोविडवर मात करुन बरे झालेल्या रुग्णांमध्ये साईड इफेक्टस दिसून येत होते. हे पोस्ट कोविड म्हणजेच म्युकरमाकोसिस ( होते.
कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा
कोविड सोबतच म्युकरमाकोसिस आटोक्यात आलेला असतानाच आता पुण्यातून ) चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, कोविडमुक्त झालेल्या पुण्यातील रुग्णांमध्ये आता नवीन बुरशी आढळून आली आहे. गेल्या तीन महिन्यांत अशा प्रकारचे चार रुग्ण आढळून आले आहेत ज्यांच्यात एक वेगळीच बुरशी आढळून आली आहे. आता या नव्या बुरशीमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
कोविडवर मात करुन पूर्ण बरे झालेल्या या रुग्णांना महिन्यानंतर सौम्य ताप आला. तसेच त्यांच्या पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना सुरू झाल्याच्या तक्रारी आल्या. सुरुवातीला या रुग्णांना स्नायू दुखी बरे होण्यावर औषधे देण्यात आली. एमआरआयमध्ये संसर्ग आढळला या रुग्णाला जेव्हा औषधांच्या उपचाराचा गुण आला नाही, तेव्हा त्याचे एमआरआय स्कॅन करण्यात आले.