कोविड योद्ध्याचं आणखी एक सामाजिक पाऊल* *कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी मोफत रिक्षा प्रवास सेवा

संवाददाता, पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, २२-४-२०२१.
पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील कोरोना काळात कोरोना झालेल्यांना मोठा धीर आधार देणारे विचारपूस करुन जवळीक साधून मनोधैर्य वाढविणारे प्रसंगी आजवर कोरोनाने मृत्यूमुखी झालेल्या ७१ मृत लोकांचे ज्यांच्या त्यांच्या धार्मिक विधीवत अंतिम संस्कार मोफत व प्रामाणिकपणे करणारे सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.युनूस पठाण.यांचे सामाजिक भरिव योगदान असताना त्यांनी स्वखर्चाने महाराष्ट्र राज्य सरकार सर्वसामान्य लोकांसाठी जे कोरोना प्रतिबंधक लसीकरण राबवित आहे या उपक्रमास मानवतेच्या दृष्टीने सर्व लसीकरणासाठी जाणाऱ्या गोरगरिब गरजू आर्थिक दुर्बल घटकातील तसेच वयोवृद्ध जेष्ठांसाठी त्यांचे राहते प्रभाग क्रमांक २३ मधील घर ते लसीकरण केंद्रा पर्यंत मोफत रिक्षा प्रवास व लसीकरण झाल्यावर पुन्हा घरा पर्यंत सुखरुप सोडण्याची मोफत व्यवस्था कामी साधारणपणे पाच रिक्षांची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे व तसेच ह्या मोफत रिक्षा प्रवास सेवा सुविधेचा प्रत्येक नागरिकाने लाभ घेऊन कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन कोरोना उच्चाटन करणे कामी पुढे यावे असे जाहिर आव्हान केले आहे
सामाजिक कार्यकर्ते मा श्री युनूस पठान यांचे कोरोना काळातील अतुलनीय सामाजिक कार्या बद्दल महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडीच्या वतीने तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यापुर्वी गौरव सन्मानाने सन्मानित केले होते परंतु त्यांनी आजही निस्वार्थ भावनेने आपले सामाजिक काम सुरुचं ठेवले आहे
सदर कामांतून मला समाधान मिळतो लोकांची सेवा होते हे मी माझे भाग्य समजतो प्रत्येक व्यक्ती हा समाजाचे देणं लागतो प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपणे कामी ह्या कोरोना राष्ट्रीय आपत्तीत पुढे येऊन सामाजिक सेवा मानवतेच्या दृष्टीने करण्यासाठी पुढे यावे असे आव्हान ही लोकांना मा. श्री. युनूस पठाण,यांनी केले आहे
तसेच रिक्षांचे क्रमांक व त्या रिक्षांवर सामाजिक संदेश बरोबरीने संपर्क क्रमांक पोस्टर लावून जनजागृती केली आहे तसेच कोविड संदर्भात काही महत्त्वाची माहिती व मदत हवी असल्यास मला निसंकोच कधीही संपर्क करा असेही नमुद केले आहे.