मराठी
पुण्यातील पर्सिस्टंट कंपनीचे सर्वेसर्वा आंनद देशपांडे अब्जाधीशांच्या यादीत

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक,६-९-२०२१.
पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टीम कंपनीचे सर्वेसर्वा आंनद देशपांडे, यांचे नाव जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत समावेश करण्यात आलं आहे. पर्सिस्टंट सिस्टीम या कंपनीमधील संपत्तीचा वाटा हा एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असल्याचं फोर्ब्ज या मासिकाने म्हटलं आहे
फोर्ब्स उद्योगपतींच्या कार्यक्षेत्रातील योगदान, महत्व त्यांचा रोजगार निर्मितीवर झालेला सामाजिक परिणाम यांचा विचार करून जगभरातील उद्योगपतींची यादी जाहीर करते. ही यादी दरवर्षी फोर्ब्ज मासिकातर्फे प्रकाशित केली जाते. अशातच या यादीत महाराष्ट्रातील एका उद्योगपतींचा समावेश करण्यात आला आहे.