आईच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने वृक्षारोपन एक आदर्श — अॅड सुभाष पाटील

अहमदनगर प्रतिनिधी :— तालुक्यातील बाभुळगाव येथील माजी सरपंच डाॅ विठ्ठलराव दामोदर पाटोळे यांच्या आई नानीबाई दामोदर पाटोळे यांचे गेल्या दहा दिवसापुर्वी वृध्पाकाळाने निधन झाले होते. त्यांचा दशक्रिया विधी आज दि ९ रोजी बाभुळगाव मधील वैकुंठ धाम येथे आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने ह भ प एकनाथ महाराज गाडे चकलंबा यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळे डाॅ पाटोळे व त्यांचे तीन भाऊ भाऊसाहेब मंज्याबापु व रावसाहेब यांनी आपल्या आईच्या स्मणार्थ वैकुंठ धाम मधील परिसरात अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम समितीचे अध्यक्ष राहुरी तालुक्याचे जेष्ठ नेते अॅड सुभाष पाटील व बा बा तनपुरे साखर कारखाण्याचे संचालक कृषीभुषन सुरसिंगराव पवार यांच्या हास्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी तनपुरे कारखान्याचे संचालक भारत तारडे डाॅ आहेर सरपंच गोरक्षनाथ गिर्हे दगडु दादा पाटोळे पो काॅ बाबासाहेब पाटोळे लक्ष्मण उंडे गोरक्षनाथ तमनर उपस्थित होते. या वेळी अॅड पाटील म्हणाले की बाभुळगाव मधील नागरिक वेगवेगळे उपक्रम राबवुन नेहमीच गावाचे वेगळेपण जिल्ह्यात दाखवित असतात. अशाचे आमचे सहकारी मित्र डाॅ पाटोळे यांनी आईच्या दशक्रिया विधी निमित्याने वृक्षारोपणाचा चांगला उपक्रम राबवुन एक आदर्श निर्माण केला असल्याचे पाटील म्हणाले . यावेळी गावातील नागरिकांच्या व पाहुण्यांच्या वतीने नानीबाईनां अखेरची श्रध्दांजली वाहण्यात आली.