पत्नीची हत्या करून पतीने मृत शरीरासोबत असं काही केलं की … ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, १८-५-२०२१.
सगळीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. दररोज हाणामारी, हत्या केल्याच्या घटना घडल्याचं कानावर येतं असतं. यामुळे समाजात हिंसक वातावरण निर्माण होत चालल आहे. अशातच अहमदनगरमध्ये पत्नीची हत्या केली असल्याची एक धक्कादायक घटना घडली असल्याची माहीती समोर आली आहे. या प्रकराणात हत्या केल्या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सगळा प्रकार १३.मे रोजी कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथे घडला असून, हत्या केलेल्या पतीचं नाव विजय ऊर्फ बंडू आप्पासाहेब गवळी असं आहे. विजयने आपली पत्नी सुवर्णाची हत्या करून, तिने आत्महत्या केली असल्याची अफवा पसरली. त्याच्या या कृत्यामुळे त्याच्यावर कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुरूवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास विजय आणि त्याची पत्नी सुवर्णा यांच्यामध्ये भांडण झालं होतं. त्यावेळी त्या भांडणामध्ये विजयने रागाच्या भरात सुवर्णाच्या डोक्यात एका जड शस्त्राने वार केला. डोक्यात जोरात मारलं असल्यामुळे पत्नी सुवर्णाचा जागीच मृत्यू झाला.
ही बाब विजयच्या लक्षात येताच त्याचा गोंधळ उडाला. हा सगळा प्रकार आपल्या अंगलट न येण्यासाठी त्यानं डोकं लावलं. विजयने सुवर्णाच्या मृत शरिरावर नवीन कपडे टाकली व त्यावर ज्वालाग्राही पदार्थ टाकून त्या मृत शरिराला जाळण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून सुर्वणाने आत्महत्याच केली असल्याचं सगळ्यांना वाटावं. त्यानंतर त्याने त्याच्या सर्व नातेवाईकांना सुर्वणाने आत्महत्या केली असल्याची खबर दिली.