मेट्रो, स्मार्ट सिटी तसेच पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्नांबाबत आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या उपस्थितीत झाली आढावा बैठक … शहरातील या विविध प्रश्नांवर वेधले लक्ष्य

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे,महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२५-६-२०२१.
: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मेट्रो यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार मेट्रोने फुटपाथ व दुभाजकांचे सुशोभिकरण, रस्त्यांची दुरुस्ती आदी कामे तातडीने पूर्ण करून देण्याच्या सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी मेट्रो प्रशासनाला दिल्या.
मेट्रो, स्मार्ट सिटी तसेच पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्नांबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या बैठकीस महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, सागर आंगोळकर, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगररचना उपसंचालक प्र.ग. नाळे, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, उप आयुक्त सुभाष इंगळे, सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, मेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बि-हाडे, अतुल गाडगीळ आदी उपस्थित होते.