मराठी
विजेचा मोठा पोल बाजूला करुन येण्या-जाण्यासाठीरस्ता मोकळा केला

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,५-८-२०२१.
बुधवार दिनांक
रात्री १०-०० वाजता भाऊ पाटील रोड बोपोडी या रस्त्याच्या मधोमध असलेला विजेचा मोठा पोल पडलेला होता, व एका कार चालकाने खुपच जोरात या विद्युत पोलला येऊन धडकला हा सर्व प्रकार पाहताच स्वता आप्पासाहेब वाडेकर,खडकी पोलीस स्टेशन व MECB विभाग बोपोडी व तसेच पुणे महानगरपालिकेचे औंध वॉर्ड ऑफिसचे विद्युत विभागाचे अधिकारी मा.अशोक केदारी, साहेब यांना तातडीने फोन केला व केदारी साहेबांनी लगेच विद्युत कर्मचारी यांना पाठून त्वरित लाईट कनेक्शन बंद करून घेतले यामुळे संभाव्य धोका व खुप मोठे जिवितहानी टळली.
आप्पासाहेब वाडेकर, यांनी स्थानिक नागरिकाच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेला पोल बाजुला करून येण्या-जाण्यासाठी मोकळा करून दिला…