बोपोडी, सांगवी, पुलासाठी ३१.कोटी

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१४-८-२०२१.
पिंपरी, सांगवी, व बोपोडी, यांना जोडण्यासाठी महापालिकेतर्फे मुळा नदीवर पूल उभारण्यात येणार आहे त्यासाठी ३०. कोटी ९९.लाख रुपयांच्या खर्चासह विविध कामांसाठी ६३. कोटी ६४.लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती सभेने मान्यता दिली स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी नितीन लांडगे, होते सांगवी व बोपोडी जोडणाऱ्या पुलामुळे पुणे मुंबई महामार्गावरील बोपोडी चौकातील वाहतूकीचा ताण कमी होईल या पुलासाठी टी अॅणड इन्फा कंपनीची लघुतम निविदा प्राप्त झाली होती सांगवी ममतानगर येथील दत्त आश्रम आणि बोपोडीतील स्मशानभूमीलगतचा भाग दुहेरी पुलामुळे जोडला जाणार आहे, त्याची रुंदी १८.६०.मीटर असेल सागवीच्या बाजुने ८०. मीटर आणि बोपोडीच्या बाजूने ५५५. मीटर भराव रस्ता असेल या पुलामुळे खडकी बाजार येरवडा, खडकी,स्टेशन औंध रोड रैजहिल्स भागात जाणे सोयीचे होणार आहे. सध्या या भागात जाण्यासाठी सांगवीतील दापोडी,बोपोडी, मार्ग सुमारे तीन किलोमीटर वळसा घालून जावे लागत आहे.