मराठी

१५.लाखांचा माडूळ जातीचा साप जप्त एकाला अटक

संवाददाता, तानाजी केदारी महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२५-६-२०२१.

पिंपरी-चिंचवडमध्ये मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकास भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
त्याच्याकडून १५ लाख रुपये किंमत असलेले मांडूळ पोलिसांनी हस्तगत केले असून,
ते वन विभागाच्या कर्मचाऱ्याकडे सुपूर्द केले आहे.
योगेश मरिआप्पा म्हेत्रे असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रायणी नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात व्यक्ती हा मांडूळ जातीचा साप विक्री करण्यास येणार असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार, वनरक्षक सुरेश बरले यांना याची माहिती दिली.
त्यानंतर, संबंधित ठिकाणी भोसरी पोलिसांनी सापळा रचला,
संशयितरित्या थांबलेल्या म्हेत्रेला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
त्याच्याकडे असलेल्या प्लॅस्टिकच्या पोत्यातील डब्ब्यात १५ लाख रुपये किंमतीचे मांडूळ आढळून आले.
तो मांडूळ विक्रीसाठी आणला होता अस त्याने पोलिसांना सांगितलं आहे.
मांडूळ जातीच्या सापाचे रक्त हे दुर्धर आजारांवर औषध म्हणून वापरले जाते.
तसेच मांडूळबद्दल अनेक अंधश्रद्धा असल्याने पैशांचा पाऊस पाडण्यासाठी देखील मांडूळ खरेदी केले जाते,
असं भोसरी पोलिसांनी सांगितल आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे आणि गुन्हे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button