१.जुलैपासून बदलणार आहेत ‘ हे ‘ आर्थिक नियम , आत्ताच घ्या जाणून , अन्यथा थेट होईल, खिशा’वर परिणाम

दिनांक,२४-६-२०२१.
१.जुलैपासून आपल्या जीवनाशी संबंधित महत्त्वपूर्ण नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक आणि घरगुती बजेटवर होणार आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमती म्हणजेच LPG दर महिन्याच्या १.तारखेला बदलतात. एसबीआय बँक एटीएममधून पैसे काढणे आणि चेक घेण्याबाबतचे नियम बदलणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया कि,१.जुलैपासून कोणते नियम बदलणार आहेत.

LPG सिलिंडर दर :- १.जुलै रोजी LPG सिलिंडर अर्थात एलपीजीच्या नवीन किंमती जाहीर केल्या जातील. तेल कंपन्या दर महिन्याच्या १.तारखेला एलपीजी दर निश्चित करतात. जुलैमध्ये हे पाहावे लागेल की कंपन्या एलपीजी आणि कमर्शियल सिलिंडरच्या किंमती वाढवतात की नाही.

SBI नियम बदलतील :- देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआय (SBI) एटीएममधून पैसे काढणे, बँक शाखेतून पैसे काढणे आणि चेक बुक यासंबंधीचे नियम बदलणार आहे. हे नवीन नियम पुढील महिन्यात १.जुलैपासून लागू होतील. एटीएम आणि बँक शाखांसह एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाउंट (BSBD) खातेधारकांसाठी दरमहा चार वेळा मोफत रोख पैसे काढणे उपलब्ध असेल. मोफत मर्यादेनंतर बँक प्रत्येक व्यवहारावर १५.रुपये अधिक जीएसटी घेईल. गृह शाखा आणि एटीएम आणि एसबीआय नसलेले एटीएमवर रोख पैसे काढण्याचे शुल्क लागू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed